Agriculture Mechanization Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Mechanization : ‘कृषी यांत्रिकीकरणा’चा ३१८ लाभार्थ्यांना लाभ

Agriculture Scheme : शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ३१८ लाभार्थ्यांना २ कोटी ७३ लाख १९ हजार रुपये इतकी अनुदान रक्कम देण्यात आली आहे.

कृषी विभागामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या बाबींमध्ये समाविष्ट यांत्रिक अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान स्वरूपात अर्थसाहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते.

कृषी विभागाच्या योजनांची ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अंमलबजावणी केली जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या बाबी शेतकऱ्यांना ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड केली जाते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ पातळीवरून प्रभावी संनियंत्रण शक्य झाले आहे.

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलीत अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलीत अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्त्वावर कृषी व अवजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी बाबी कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत अनुदानासाठी समाविष्ट आहेत.

जिल्ह्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत संगणकीय सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी आवश्यक अटींची पूर्तता केलेल्या ३१८ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT