Baramati Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Water Supply Scheme : बृहत् बारामती पाणीपुरवठा योजनेस गती

काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांची अवस्था खराब झाल्याने तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या साठी महत्वाकांक्षी बृहत बारामती पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली.

टीम ॲग्रोवन

बारामती ः शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वाहिन्या (Water Line) बदलून नवीन वाहिन्या टाकण्याच्या कामाला पुन्हा प्रारंभ झाला आहे. गळती (Water Leakage) कमी करून पुरेशा दाबाने नागरिकांच्या घरात पाणी देण्याच्या बृहतबारामती पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन साठवण तलाव, एक जलशुध्दीकरण केंद्र व ३५० कि.मी. लांबीच्या वाहिन्या बदलण्याच्या कामाचा समावेश आहे.

काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांची अवस्था खराब झाल्याने तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या साठी महत्वाकांक्षी बृहत बारामती पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. या मध्ये एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलिथिलिन) पाईपचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता प्रकाश जगताप यांनी दिली.

या कामापैकी पहिल्या टप्प्यातील जवळपास साठ कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित काम टप्याटप्याने पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत तांदुळवाडी व जळोची येथे अनुक्रमे २०० व १७५ दशलक्ष लिटर्स साठवण क्षमतेचे दोन तलाव उभारले जाणार आहेत.

या शिवाय सध्याच्या बारामती नगरपालिकेच्या जुन्या जलशुध्दीकरण केंद्राच्या जागी नवीन जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या कामाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT