Namo Farmer Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Namo Farmer Scheme : कोल्हापूर जिल्ह्यातील ९० हजार शेतकरी किसान सन्मान योजनेच्या १४ व्या हप्त्याला मुकणार

Kisan Yojana: केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधी म्हणून वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जातात. याच धर्तीवर आता राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देण्याची घोषणा करण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News : केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधी म्हणून वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जातात. याच धर्तीवर आता राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देण्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून वर्षाला १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्राबरोबर राज्यातील सरकारने लाभार्थ्यांना यासाठी काही अटी घातल्या आहेत.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी व बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केली नाही. अशा शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ९० हजार ९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना १४ वा हफ्ता मिळू शकणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

याविषयी शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास कृषी सहायक तसेच ग्रामपंचायत आणि कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले. ही ई-केवायसी 'चेहरा प्रमाणीकरण करून या योजनेचा लाभ घेता येईल असेही त्यांनी सांगितले.

अशी चेक करा यादी

शेतकरी आता पीएम किसानच्या वेबसाइटवर १४ व्या हप्त्यासाठी त्यांची स्थिती तपासू शकतात. यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील की नाही ते पाहता येईल. स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

वेबसाइटवरील फार्मर्स कॉर्नरवर जा आणि लाभार्थी स्थितीचा पर्याय निवडा. यावर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन नंबरद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही हे पाहू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT