Horticulture Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Fruit Crop Cultivation : ‘मग्रारोहयो’तून ८७७ शेतकऱ्यांनी केली फळपिकांची लागवड

शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबतच फळे व फुले या पिकांकडे आकर्षित करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मग्रारोहयो) योजनेअंतर्गत साह्य दिले जाते.

Team Agrowon

Wardha News : शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबतच फळे व फुले या पिकांकडे आकर्षित करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MGNAREGA) योजनेअंतर्गत साह्य दिले जाते. या योजनेतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ८७७ शेतकऱ्यांनी फळपिकांची लागवड केली आहे.

फळबाग लागवडीच्या लाभासाठी शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास याजनेचे लाभार्थी, कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी अर्थात १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक किंवा कुळ व सीमांत शेतकरी, अर्थात १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक किंवा कुळ, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती फळबाग योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मग्रारोहयोअंतर्गत जॉब कार्डधारकावरील प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कुळ कायद्याखाली येत असेल आणि सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर ही योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात येते.

इच्छुक लाभार्थ्याने सातबारा व ८-अ च्या उताऱ्यासह विहित नमुन्यातील अर्ज कृषी विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कार्यपद्धतीनुसार दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लागवडीसाठी साह्य केले जाते. त्यानुसार लाभार्थ्यांना या क्षेत्राच्या मर्यादेत वृक्ष, फळझाड लागवड करता येते.

या योजनेंतर्गत फळझाड, वृक्ष लागवडीचा कालावधी १ जून ते ३० नोव्हेबर असा आहे. सन २०२२-२३ या वर्षांत आंबा, सीताफळ, फणस, बांबू, नारळ, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, कागदी लिंबू, साग, निशिगंधा, गुलाब या फळपिकांची जिल्ह्यात ७३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तर लागवडीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ८७७ इतकी आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT