Agriculture Irrigation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Irrigation : ‘शाश्वत कृषी सिंचन’मधून सोलापूरसाठी ६९० शेततळी

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळी मिळणार आहेत. या योजनेतून सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ६९० शेततळी आली आहेत.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन (sustainable Agriculture Irrigation Scheme ) योजनेतून शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळी (Farm Pond) मिळणार आहेत. या योजनेतून सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ६९० शेततळी आली आहेत. लवकरच ऑनलाइन पद्धतीने आलेल्या अर्जातून लॅाटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

मागेल त्याला शेततळे या नावाने पूर्वी ही योजना होती. पण आता त्याचे नाव बदलून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना असे करण्यात आले आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ दिला जाणार आहे. राज्यासाठी सुमारे १३ हजार ५०० शेततळी मंजूर कऱण्यात आली आहेत.

त्यात १५ फूट (लांबी-रुंदी) आणि तीन मीटर खोल तर ३४ फूट लांबी-रुंदी असलेल्या शेतळ्याची खोली तीन मीटर असायला हवी. लाभार्थी निवड झाल्यानंतर त्यांनी शेततळे पूर्ण करावयाचे आहे, त्यानंतर या शेततळ्याची पाहणी कृषी अधिकारी शेतात येऊन करतील, त्यानंतर ते पूर्ण झाल्याबाबत पडताळणी करून अनुदान देतील. त्यासाठी सुमारे ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

असे असतील निकष...

महाडिबीटीवरील अर्जाद्वारेच यासाठी अर्ज करता येईल. सात-बारा उतारा, आठ अ, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, मागासवर्गीय असल्यास प्रमाणपत्र आवश्यक असेल. संबंधित लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान एक एकर जमीन असावी, तो पूर्वीचा लाभार्थी नसावा, कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर निवड झालेल्यांचे शेततळ्याची जागा पाहून कार्यारंभ आदेश दिला जाईल, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT