PM Kisan 13th Installment Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Pm Kisan : शेतकरी सन्मान योजनेचे ६०७७ लाभार्थी राहणार वंचित

केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेतंर्गत अनेक शेतकरी यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून वार्षिक ६ हजार रुपये प्राप्त करीत आहेत.

Team Agrowon

PM Kisan Scheme रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान (PM Kisan Scheme) निधी या योजनेतंर्गत अनेक शेतकरी यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी (PM Kisan Online Registration) करून वार्षिक ६ हजार रुपये प्राप्त करीत आहेत.

या योजनेच्या लाभर्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने बॅंक खाते आधार लिंक (Aadhar Linking) असणे आवश्यक आहे, त्याशिवाय लाभर्थ्यांना या योजनेचा १३ वा हफ्ता मिळणार नाही.

रत्नागिरी तालुक्यातील एकूण लाभार्थींपैकी तब्बल ६ हजार ०७७ इतक्या लाभार्थी यांची बॅंक खाती आधार लिंक नसल्याचे कळविण्यात आलेले आहेत.

या लाभर्थ्यांनी पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी दिलेले आपले बॅंक खाते आधार लिंक करण्यासाठी तत्काळ आपले बॅंक खाते असलेल्या शाखेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे.

ज्यांचे बॅंक खाते आधार लिंक नाही, त्या लाभनर्थ्यांची गावनिहाय यादी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देण्यात आलेले आहेत.

त्यांच्याकडून आपल्या नावाची खात्री करून बॅंक खाते आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील लाभार्थ्यांना केले आहे.

लाभार्थ्यांचे आधार लिंक नसेल तर झिरो बॅलन्सवर नजीकच्या पोस्ट ऑफीसमधून पोस्टल बॅंकांमध्ये बॅंक खाते उघडू शकता. यापैकी कोणत्याही मार्गाने लाभार्थी बॅंक खाते आधार लिंक करू शकतात. शासकीय फी आकारण्यात येणार नाही, असे जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT