Farmer Accident Insurance Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Accident Insurance Scheme : ‘शेतकरी अपघात विमा’अंतर्गत ५२ लाख रुपये अनुदानवाटप

Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना खंडित कालावधी ता.७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या दरम्यान परभणी जिल्ह्यात ४४ प्रस्ताव दाखल होते.

Team Agrowon

Parbhani News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना खंडित कालावधी ता.७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या दरम्यान परभणी जिल्ह्यात ४४ प्रस्ताव दाखल होते. त्यापैकी मंजूर २७ प्रस्तावांतर्गत ५२ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अनुदान वितरित प्रस्तावांमध्ये परभणी, मानवत तालुक्यातील प्रत्येकी १ प्रस्तावांतर्गत प्रत्येकी २ लाख रुपये, गंगाखेड, पालम तालुक्यातील प्रत्येकी २ प्रस्तावांतर्गत प्रत्येकी ४ लाख रुपये, जिंतूर, पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी ४ प्रस्तावांतर्गत प्रत्येकी ८ लाख रुपये, सोनपेठ तालुक्यातील ६ प्रस्तावांतर्गत ११ लाख रुपये, सेलू तालुक्यातील ७ प्रस्तावांतर्गत १३ लाख रुपये असे एकूण ५२ लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०१९-२० मध्ये दाखल १०० पैकी ६२ प्रस्ताव मंजूर झाले तर २ प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०२१-२२ मध्ये दाखल १०६ पैकी ५४ प्रस्ताव मंजूर झाले असून ३६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपघात झालेल्या कुटुंबीयांच्या वारसदारांना १ ते २ लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांनी कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विमा प्रस्ताव तत्काळ सादर करावेत असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विमा सल्लागार कंपनीच्या १८००२२०८१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या १८००२२४०३० किंवा १८००२००४०३० या टोल फ्री क्रमांकावर पूर्व सूचनेची नोंद करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील त्रुटी काढून शेतकरी अनुकूल कार्यपद्धती अवलंबली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT