Agriculture Mechanization Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Mechanization : सांगलीतील ४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ

Agriculture Scheme : जिल्ह्यात शासकीय अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृतीदेखील केली जात आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात शासकीय अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृतीदेखील केली जात आहे.

जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात ४ हजार २०४ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतला असून शेतकऱ्यांना २९ कोटी ६७ लाखांचे अनुदान अदा झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

केंद्र शासनाकडून यांत्रिक शेतीसाठी ट्रॅक्टर आणि मशागत साहित्यावर अनुदान दिले जाते. त्यात लॉटरी पद्धतीने लाभार्थी ठरवले जातात. गेल्या पाच वर्षात ट्रॅक्टर, पॉवर टिलरसाठीची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे.

कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेत शेतकरी शेतीला लागणाऱ्या यंत्रासाठी अर्ज करत आहेत. या योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ब्लोअर, पेरणीयंत्र, नांगर ही यंत्रे मिळत आहेत.

जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४ हजार २०४ लाभार्थी शेतकऱ्यांना यंत्रे अनुदानामार्फत मिळाली आहेत. या शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लाखांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी विविध योजनेत सहभागी होत आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज दाखल केले असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT