Loan Waive Scheme
Loan Waive Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Subsidy : सांगलीत शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा

टीम ॲग्रोवन

सांगली ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farmer Loan Waive Scheme) नियमित कर्ज भरणाऱ्या (Loan Repayment) जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान (Incentive Subsidy) वर्ग करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडील ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १८५ कोटी आणि उर्वरित बॅंकांकडील शेतकऱ्यांच्या खात्यात १५ कोटींचे अनुदान जमा झाले आहे. दरम्यान, अद्याप जिल्ह्यातील एक लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिवाळीनंतर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोस्ताहनपर अनुदान देण्याबाबत अंमलबजावणी सुरू केली. मार्चमध्ये सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी तरतूद केली होती.

राज्यातील सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या १ लाख ६० हजार ७९५ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोट केली आहे. पहिल्या यादीमध्ये ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६१ हजार २८१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकर केले आहे.

जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडील ५१ हजार शेतकऱ्यांच्या तब्बल १८५ कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश आहे. उर्वरित राष्ट्रीय आणि व्यापारी बॅंकाकील रक्कम सुमारे १५ कोटी रुपये आहे.

पहिल्या यादीमध्ये समाविष्ट मात्र आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ व तक्रारी असलेल्या ४५५ शेतकऱ्यांचा निर्णय पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT