Horticulture  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Orchard planting : परभणीत फळबाग लागवडीसाठी २ कोटी ७९ लाखांची तरतूद

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी परभणी जिल्ह्यासाठी २ कोटी ७९ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Team Agrowon

परभणी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड (Orchard planting) योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी परभणी जिल्ह्यासाठी २ कोटी ७९ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांना बुधवार (ता. ३०) पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.

या योजनेअंतर्गत यंदा सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी २ कोटी ६७ लाख ८९ हजार रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १० लाख ३२ हजार रुपये, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १ लाख ३४ हजार रुपये यानुसार एकूण २ कोटी ७९ लाख ५५ हजार रुपये एवढा आर्थिक लक्षांक प्राप्त झालेला आहे.

त्यात खड्डे खोदणे, कलमे रोपे लागवड करणे,पीक संरक्षण,नांग्या भरणे व ठिबक सिंचनाव्दारे पाणी देणे या बाबीकरीता १०० टक्के अनुदान देय आहे. लाभार्थ्यास तीन वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० प्रमाणे अनुदान अदा करण्यात येईल. फळबाग लागवडीकरीता किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलचे https://mahadbt mahait.gov.in/ या संकेतस्थळावर बुधवार (ता. ३०) पर्यंत अर्ज करावेत. अर्जासोबत अद्यावयवत ७-१२ उतारा आणि ८-अ उतारा, सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करावे. आधार कार्ड, आधार लिंक बँक खाते क्रमांक, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी या लिंबुवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल कागदपत्राबरोबर अपलोड करावा.

अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे.

या फळपीकांसाठी मिळणार अनुदान...

यामध्ये आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू अशा एकूण १६ फळपीकांचा समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT