Farmer Loan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Scheme : नियमित कर्जदारांचे १०० कोटी अडकले

नियमित कर्ज भरणाऱ्या एक लाख ६० हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला.

Team Agrowon

सांगली ः ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपताच महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत (Mahatma Phule Loan Waive Scheme) प्रोत्साहन अनुदानासाठी (Incentive Scheme) पात्र ठरलेल्या २५ हजार १०२ शेतकऱ्यांची दुसरी यादी पंधरा दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली.

त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील २३ हजार ६३ व अन्य बँकाकडील दोन हजार ३९ शेतकरी याशिवाय दिवाळीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या यादीतील सहा हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपये अडकले आहेत. आधार लिंकिंग पूर्ण होऊनही शासनाकडून निधी वर्ग करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या एक लाख ६० हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच योजनेतील दुसरी यादी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील २५ हजार १०२ शेतकऱ्यांची दुसरी यादी आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील २३ हजार ६३ व अन्य बँकाकडील दोन हजार ३९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान दिवाळीपूर्वी ६१ हजार ८५९ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी ५६ हजार १२७ शेतकऱ्यांना अनुदानाचे २०५ कोटी रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले.

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले तसेच तक्रारी असलेल्या सहा हजार शेतकऱ्यांनाही अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही.

पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तहसीलदार आणि तालुका उपनिबंधकांनी सुनावणी घेतली. त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीही निकालात काढण्यात आल्या आहेत.

पहिल्या यादीतील सहा हजार, दुसऱ्या यादीतील २५ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झाले आहे. पहिल्या यादीतील आधार लिंक पूर्ण होताच प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते. दुसरी यादी प्रसिद्ध होऊन पंधरा दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे.

शेतकरी आणि संबंधित बँकांनी त्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील ३१ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपये अडकले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT