Banana Export Agrowon
मुख्य बातम्या

Banana Board : केळी महामंडळासाठी जागा निश्चीत होईना

Banana Development Corporation : जळगाव (Jalgaon) हा केळी उत्पादक (banana crop) जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात केळी विकास महामंडळास राज्याने मंजुरी दिली आहे. पण या महामंडळाचे कार्यालय व इतर यंत्रणा कुठे उभी राहील, हा प्रश्‍न आहे. त्याची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. या महामंडळास हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे.

केळी महामंडळासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जागा उपलब्ध आहे. त्याबाबत पाहणीदेखील प्रशासनाने केली आहे. परंतु हे विद्यापीठ जळगाव शहरापासून लांब आहे. केळी उत्पादक जामनेर, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगर, चोपडा, भडगाव, पाचोरा, धरणगाव या भागांत अधिक आहेत. या भागातील शेतकऱ्यांसाठी सोईची जागा निवडण्याची गरज आहे. विद्यापीठ अकृषिक आहे. तेथे यासंबंधीचे कार्यालय असू नये, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरी जागा ममुराबाद (ता. जळगाव) येथील कापूस संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रालगत आहे. याबाबतही पाहणी झाली आहे. तसेच तिसरी जागा जळगाव शहरालगत निमखेडी शिवारातील तेलबिया, केळी संशोधन केंद्रांच्या भागातही आहे. यात कापूस संशोधन केंद्र किंवा निमखेडी भागातील केळी, तेलबिया संशोधन केंद्रांलगत केळी विकास महामंडळ असावे, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण या भागात विविध पिकांचे प्रक्षेत्र आहे.

संशोधक, संशोधन प्रयोगशाळा व इतर अधिकारीदेखील याच भागात आहेत. यामुळे केळी महामंडळाची जागा कृषी संशोधन केंद्रांलगत असावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण जागेची निश्चिती विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा होऊनही झालेली नाही. जागा निश्चितीनंतर महामंडळाबाबत पुढील प्रक्रिया सुरू होईल. पण यातच वेळ अधिकचा गेला आहे. ५० कोटी रुपये निधी यासंबंधी शासनाने किंवा फलोत्पादन विभागाने जाहीर केला आहे.

हरिभाऊंच्या नावाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

केळी विकास महामंडळाला माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवला. त्यास सर्व आमदार व लोकप्रतिनिधींनी मंजुरी दिली. संसदेत सदस्य असताना व राज्यातही विधीमंडळात हरिभाऊ यांनी केळीप्रश्न सातत्याने मांडला. केळीवरील करपा, केळीसंबंधीची विमा योजना याबाबत ते सतत प्रश्न, समस्या मांडत राहिले. यामुळे त्यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले व शेतकऱ्यांनीदेखील याबाबत आनंद व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT