swami prasad maurya 
मुख्य बातम्या

उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला धक्का

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील वजनदार कॅबिनेट मंत्री आणि ओबीसींचे नेते असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपच्या निवडणूक रणनीतीला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

टीम अॅग्रोवन

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. तर गोव्यात मंत्री मायकेल लोबो यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याआधी भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांनीही पक्षाला रामराम ठोकला.      उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील वजनदार कॅबिनेट मंत्री आणि ओबीसींचे नेते असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपच्या निवडणूक रणनीतीला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी मतपेढीवर परिणाम होणार असून हे नुकसान रोखण्यासाठी पक्षाला पावले उचलावी लागणार आहेत, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

ओबीसी समाज आधीच योगी सरकारच्या कारभारावर नाराज आहे. केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी आमचा वापर करून घेतला जातो,  परंतु सत्ता राबवताना मात्र उच्च जातींना पदे देऊन ओबीसींची उपेक्षा केली जाते, अशी नाराजीची भावना आहे. मौर्य यांच्या पक्षत्यागानंतर ही भावना आणखी ठळक होण्याची शक्यता आहे. भाजपचे आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

स्वामी प्रसाद मौर्य  हे एके काळी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे निकटवर्तीय मानले जात. मायावतींच्या सरकारमध्ये मौर्य यांनी मंत्रीपदही भूषवले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाकडून पैसे घेऊन तिकीट वाटप केले जात असल्याचा आरोप करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.  गोव्यातही फाटाफुट

गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजप सरकारच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. मायकेल लोबो आणि प्रवीण झांट्ये यांनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे. भाजपचा राजीनामा देणारे मायकल लोबो गोव्यातील पहिले मंत्री आणि तिसरे आमदार आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजप आमदारांची संख्या कमी होऊन २४ इतकी झाली आहे. मायकल लोबो हे गोव्यातील कलंगुट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते. दिवंगत मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते मनोहर पर्रिकर यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT