Market Agrowon
मुख्य बातम्या

लासलगावात शेतकऱ्यांकडून दीड तास कांदा लिलाव बंद

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतीतून ट्रॅक्टर चोरीला गेला. ही घटना सोमवारी ( ता.२८) रात्री घडली.

टीम ॲग्रोवन

नाशिक: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतीतून(APMC) ट्रॅक्टर चोरीला गेला. ही घटना सोमवारी ( ता.२८) रात्री घडली. या बाबत शेतकऱ्याने बाजार समिती प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) सोमवारी सकाळी १०.३५ वाजता बाजार आवारात लिलाव बंद पाडले. अखेर दीड तासाने वातावरण निवळल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले.

टाकळी विंचूर येथील शेतकरी सुरेश आबाजी काळे यांनी नवा ट्रॅक्टर व कांद्याची भरलेली ट्रॉली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार (Onion Market) आवारात लावला. ते घरी निघून गेले. सकाळी पुन्हा बाजार समितीत (Market committee) आल्यानंतर ट्रॅक्टर दिसून आला नाही. यावर ट्रॅक्टर चोरी गेल्याचे लक्षात आले. सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी शेतमाल (Agriculture) लिलाव बंद पाडले. आवाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच गर्दी केली होती. यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत ट्रॅक्टर सापडत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी (Farmer) घेतली.

बाजार समितीने संबंधित शेतकऱ्याची (Farmer) समजूत काढली. त्यानंतर पुन्हा लिलाव पूर्ववत झाले. मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने नव्याने कांदा (Onion) लिलावासाठी येणारे व लिलाव होऊन बाहेर जाणारे ट्रॅक्टर अडकून पडले. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT