उद्योगमंत्री सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई 
मुख्य बातम्या

इराण–भारतादरम्यान कृषी उत्पादनांचा व्यापार वाढावा ः उद्योगमंत्री सुभाष देसाई

टीम अॅग्रोवन

मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असलेले राज्य आहे. कृषी उत्पादनाच्या बाबतीतही राज्य समृद्ध आहे. इराणसोबत असलेल्या तेल व्यापारासह कृषी उत्पादनाच्या व्यापारातही वाढ व्हावी, अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. 

ऑल इंडिया असोशिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने नुकत्याच आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ. मोहम्मद जावेद झरीफ यांच्यासोबत राज्यातील उद्योजकांशी संवाद असे या चर्चासत्राचे स्वरूप होते. या वेळी इराणचे उपमंत्री सय्यद अब्बास मुसारी, इराणचे राजदूत अली चिंगानी, इराणचे भारतातील वाणिज्यदूत अली खिलानी आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

या वेळी श्री. देसाई म्हणाले, की देशाच्या एकूण सकल उत्पन्नाच्या १५ टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. देशातून होणाऱ्या निर्यातीत एक तृतीयांश निर्यात ही राज्यातून होत असते. थेट परकीय गुंतवणुकीतही राज्यातून सर्वाधिक गुंतवणूक होत आहे. यासोबतच उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे घटक जमीन, पाणी, वीज आणि कुशल मनुष्यबळ इथे मुबलक प्रमाणात आहे. राज्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इराणसोबत भारताचे मित्रत्वाचे संबध आहेत. हे संबध अधिक दृढ होतील असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

‘नॅनो तंत्रज्ञानाचा वापर भारताने करावा’ तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जागतिक चित्र बदलले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रात इराण आज देशात आघाडीवर आहे. या तंत्रज्ञानाचा वापर भारताने करावा, असे डॉ. मोहम्मद जावेद झरीफ यांनी या वेळी सांगितले. अभियांत्रिकी प्रशिक्षणात इराण जगात चौथ्या क्रमांकावर आहे. रुपया आणि रुबेल या इराणी चलनामध्ये औद्योगिक व्यवहार व्हायला पाहिजेत. यासाठी भारतात इराण बॅंक सुरू करण्यासंदर्भातही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT