सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे 
मुख्य बातम्या

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करा : मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादींचा आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

टीम अॅग्रोवन

मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादींचा आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले. महामंडळाच्या माध्यमातून कंपनी कायद्याच्या अंतर्गत ऊसतोड मजुरांची नोंदणी १५ दिवसांत करण्याचे निर्देश यावेळी श्री. मुंडे यांनी दिले.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२९) ऊसतोड कामगार कल्याण मंडळाबाबत बैठक पार पडली. बैठकीत ऊसतोडणीचा हंगाम येत्या काही दिवसांत सुरू होत असून, कामगारांची सरकारकडे नोंद करून त्यांना ओळखपत्र देणे, आरोग्य तपासणी करणे तसेच ऊसतोड कामगार तसेच त्यांच्या पशूंना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्यासंबंधी चर्चा झाली.  महामंडळाची रचना कशी असावी, घटना, आकृतिबंध तयार करणे, महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी या सर्वच विषयांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी, त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी महामंडळाच्या माध्यमातून काही कल्याणकारी योजना राबविण्याचा आपला मानस असून यासाठी त्याद्वारे निधी उभा करण्यासाठी सहकार विभागासोबत चर्चा सुरू असल्याचे श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे महामंडळासाठी निधी उभा करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असून, ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कायदा लागू करण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले. ‘कामगारांच्या मुलींसाठी निवासी शाळा उभारणार’ ज्या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांची संख्या सर्वाधिक आहे, असे पाच तालुके निवडून तेथे ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी स्वतंत्र पाच निवासी शाळा उभारण्यात येतील. याद्वारे मुलींना मोफत शिक्षण, सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी निधी तसेच अन्य बाबी उभ्या करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली असल्याचेही श्री. मुंडे यांनी बैठकीत जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT