Madhya Pradesh Rain Agrowon
मुख्य बातम्या

Madhya Pradesh Flood : मध्यप्रदेशमध्ये नर्मदेला महापूर ; इंदूर बुऱ्हाणपूर ते सोलापूर महामार्ग 24 तासांपासून बंद

Madhya Pradesh Rain : मध्यप्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांपासून पडत असलेल्या मुसधार पावसामुळे नर्मदा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात येणार इंदूर बुऱ्हाणपूर ते सोलापूर हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

Swapnil Shinde

MP Heavy Rainfall : मध्य प्रदेशामध्ये गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे. तर नर्मदा आणि शिप्रा नदीला पूर आला असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या महापुरामुळे उज्जैन - इंदूर - बुऱ्हाणपूर - सोलापूर हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली. अनेक नद्यांनी रौद्ररुप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नर्मदा नदीवरील धरणांचे सात दरवाजे उघडण्यात आले.

ओंकारेश्वरमध्ये धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे जबलपूर, नरसिंहपुर, रायसेन, नर्मदापुरम, खंडवा जिल्ह्यांतील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सध्या उज्जैनमधील अनेक मंदिरं आणि घाट पाण्याखाली गेले आहेत.

मोरटक्का येथील नर्मदा नदीच्या पुलापासून केवळ दोन फुटांच्या अंतरावर पाणी आले आहे. त्यामुळे उज्जैन - इंदूर - बुऱ्हाणपूर - सोलापूर महामार्ग मागील 24 तासांपासून बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकल्याची भिती निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT