संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

चालू महिन्यात पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे होणार 

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात गारपीट व पूर्वमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तसे अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (ता.२२) जारी करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात गारपीट व पूर्वमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तसे अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (ता.२२) जारी करण्यात आले. 

या आपत्तीत पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करावेत. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य ती मदत मिळावी, यासाठी सविस्तर अहवाल अ, ब, क, ड या नमुन्यांमध्ये कृषी आयुक्तांमार्फत शासनाला पाठवावा. 

फेब्रुवारी व मार्च महिन्यात अशाच प्रकारच्या गारपीट व पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्याबाबत ज्या पिकांसाठी मदतीची मागणी केली आहे अथवा केली जाणार आहे, त्या पिकांचा समावेश अथवा मदतीची द्विरुक्ती यात होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना या आपत्ती काळात मदत व्हावी, यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी हे आदेश जारी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापूस दरात किंचीत घसरण, तूर आवकेत चढ-उतार, दुधी भोपळ्याच्या दरात चढ-उतार, कांदा दर कायम तर सफरचंद दरात बदल

Tur Crop Management: तूर पीक जोमात; फवारणी, खत व्यवस्थापनाला वेग

Cabinet Meeting : शेतकऱ्यांच्या योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय

Flood Damage Compensation: मृत पशुधनासाठी ४० हजार, अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीपोटी वाढीव मदत जाहीर

Rain Update : कोकण, घाटमाथ्यासह दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT