पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार 
मुख्य बातम्या

दुधातील भेसळ रोखण्यासाठी आता ‘क्यूआर कोड’ : मंत्री सुनिल केदार

टीम अॅग्रोवन

मुंबई  : राज्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्रे, दुधावरील प्रक्रिया केंद्रे या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्या क्यूआर कोडच्या माध्यमातून भेसळ करणाऱ्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

दूधभेसळ रोखण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित विविध कंपन्यांच्या सादरीकरणाप्रसंगी मंत्री केदार बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की दुधाची गुणवत्ता, दर्जा राखण्याकरिता शेतकरी दूध काढण्यासाठी हात मोजे वापरतात किंवा नाही, दूध काढण्याचे भांडे, दूध संकलन केंद्राच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. दूध संकलन केंद्रे आणि दुधाची प्रक्रिया करण्यात येणाऱ्या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आहे.

दुधातील भेसळ रोखल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. तसेच, ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम दिसणार आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, ‘भेसळमुक्त राज्य’ करणार असल्याचेही मंत्री केदार यांनी सांगितले. या वेळी डी एनव्ही-जीएल आणि आयआरक्यूएस या कंपन्यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी आणि दुधाचा दर्जा राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो याचे सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

Agri Union Budget: भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक घोषणा

Union Budget 2026-27: कर्तव्यांच्या त्रिसूत्रीवर अर्थसंकल्पाचा भर

Maharashtra Winter Weather: उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT