संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी ३१नंतरच : कारखान्यांचा निर्णय

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : नव्या सरकारकडून कर्जमाफीची शक्यता असल्याने यंदाची उसाची एफआरपी सोमवारनंतरच (ता. ३०) देण्‍याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला. 

श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली. या वेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. बैठकीत ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याबरोबर पूरग्रस्त भागातील ऊसतोड अग्रक्रमाने करण्याचा निर्णय या वेळी झाला.

बैठकीत कर्जमाफीवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महापूर, अवकाळी, मॉन्सूनोत्तर पाऊस आणि अतिवृष्टीने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बिलेही मिळाली पाहिजेत आणि कर्जमाफीही मिळाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी होण्याची अपेक्षा आहे. ज्यांची कर्जे नाहीत, कर्जमाफीचा लाभ ज्यांना नको आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीप्रमाणे बिले जमा करण्यात येणार आहेत. कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही एफआरपीप्रमाणे बिले दिली जातील. साखरेचा दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये झाल्याशिवाय कारखानदारी टिकणार नाही. त्यामुळे हा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

यंदाचा हंगाम लवकर संपणार आहे. तसेच उत्पादनही घटणार आहे. त्यामुळे बँकांची कर्जे फिटणार नाही. त्यामुळे कर्जांचे सात वर्षांचे पुनर्गठन करुन सरकारने थकहमी आणि व्याज द्यावे, निर्यात साखरेसाठी कर्जाला कमी पडणारी रक्कम राज्य आणि जिल्हा बँकांनी कर्जरुपाने देऊन अनुदानाची रक्कम भरणा करण्याच्या अटीवर साखर सोडण्यात यावी, अशी मागणी करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT