संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

उजनी धरणातून शेतीसाठी १ मेपासून आवर्तन

टीम अॅग्रोवन

सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील पिकांसाठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले असून, येत्या १ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनातून कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा झाला होता. सुरुवातीला पाऊस झाला नाही, पण शेवटी झालेल्या पावसावर धरण शंभर टक्के भरले. पण आता उन्हाळा जसजसा वाढतो आहे, तसतसा पाणीसाठा कमी होतो आहे. गेल्याच आठवड्यात सोलापूर शहरासाठी भीमानदीतून पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी औज बंधाऱ्यात पोचल्यानंतर पाणी सोडणे बंद केले.

तसेच शेतीच्या पाणी वाटप नियोजनानुसार उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडावयाचे असल्याने हे पाणी दोन दिवसापूर्वी बंद करण्यात आले. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने १ मेपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा ७० टीएमसी इतका आहे. त्यापैकी उपयुक्त पाण्याची टक्केवारी १३ आहे. आधी शहराच्या पिण्यासाठी पाणी सोडले आहे. आता शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने पाणीसाठा आणखी घटण्याची शक्यता आहे. पण नियोजनानुसार शेतीसाठी पाणी सोडण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT