संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जातिवंत, दुधाळ गायींच्या पैदाशीसाठी परदेशी रेतमात्रा आणणार ः विनय कोरे 

वारणानगर, जि. कोल्हापूर : वारणा परिसरातील पशूपालकांच्या गोठ्यात जातिवंत आणि अधिक दूध देणाऱ्या गाई तयार होण्यासाठी वारणा दूध संघामार्फत प्रगत देशातील रेतमात्रा आणण्यात येणार असल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

वारणानगर, जि. कोल्हापूर  : वारणा परिसरातील पशूपालकांच्या गोठ्यात जातिवंत आणि अधिक दूध देणाऱ्या गाई तयार होण्यासाठी वारणा दूध संघामार्फत प्रगत देशातील रेतमात्रा आणण्यात येणार आहेत. जातीवंत गाईंच्या पैदाशीसाठी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी दिली. 

श्री. कोरे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की वारणेच्या कार्यक्षेत्रामध्ये जातिवंत दुधाळ गायींची पैदास वाढविण्यासाठी प्रगत देशातून रेतमात्रा आणण्यात येणार आहेत. यामुळे सध्यापेक्षा अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई पशूपालकांच्या गोठ्यामध्ये तयार होणार आहेत. संघाचे वीस पशूतज्ज्ञ वारणा परिसरातील १०० गावांमध्ये रेतमात्रा योजना राबविणार आहेत. संघातर्फे अल्पदरात पशूपालकांना या रेतमात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

संघातर्फे येत्या काळात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. यासाठी इस्त्राईल, जर्मनी, हॉलंड या देशांशी करार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याचबरोबरीने जातिवंत वासरे संगोपन, देशी जनावरांची पैदास यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. संघाने २०१६ मध्ये ३० जातिवंत गीर गायी सौराष्ट्र (गुजरात) येथून आणल्या आहेत.

संघाच्या गोठ्यामध्ये देशी गायींच्या पैदाशीचा उपक्रम सुरू आहे. सेंद्रिय शेती, दूध उत्पादनास मोठे महत्व आल्याने संघाने अशा योजनांना प्राधान्य दिले आहे.  यावेळी कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, अकाऊंट ऑफिसर सुधीर कामेरीकर, पशूवैद्यक विभाग प्रमुख डॉ. एन. एस. वडजे, डॉ.जे.बी. पाटील, डॉ.ओ. पी. कोटगिरे, शेती अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT