प्रशासक मधुकांत गरड 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समिती देणार मार्केट इंटेलिजन्स : प्रशासक मधुकांत गरड

पुणे ः शेतकऱ्यांना शेतमालाच्या आणि विशेषतः नाशवंत शेतमालाच्या बाजारपेठेतील चढउताराची फळे, भाजीपाला आणि फुलनिहाय माहिती मार्केट इंटेलिजन्सद्वारे देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती पुणे बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

पुणे  ः शेतकऱ्यांना शेतमालाच्या आणि विशेषतः नाशवंत शेतमालाच्या बाजारपेठेतील चढउताराची फळे, भाजीपाला आणि फुलनिहाय माहिती मार्केट इंटेलिजन्सद्वारे देण्याचा प्रयत्न राहणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना बाजारपेठेचा शोध घेणे अधिक सोपे होणार आहे, अशी माहिती पुणे बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. 

श्री. गरड म्हणाले, की शेतीमाल खरेदी विक्रीसाठी प्रभावी मार्केट इंटेलिजन्स नसल्याने शेतकरी एकाच बाजारपेठेवर अवलंबून आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी पुणे बाजार समितीमध्ये होणाऱ्या फळे, भाजीपाला आणि फुले या प्रमुख शेतीमालाच्या दरांचे रोजचे, आठवड्याचे आणि महिन्यांच्या बाजारभावांचे पृथ्थकरण देण्यात येणार आहे. यासाठी पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर या प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा डाटाबेस आडतदारांद्वारे संकलित केला जाणार आहे.  बाजार समितीच्या वतीने सात मजली फूल बाजार उभारण्यात येत आहे. याचे काम सध्या थांबले आहे. यावर आणखी खर्च होऊन, हा बाजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून बाजारातील सातव्या मजल्यावर फुलांची ने आण, खरेदी-विक्री कशी होणार याबाबतची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. तसा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. 

एक देश एक बाजार या कायद्यानुसार बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले आहे. मात्र बाजार आवारात सेस असून, आवारा बाहेर सेस नसल्याने बाजारात अन्नधान्याची आवक होणार नाही, अशी भीती व्यापाऱ्यांना आहे. याबाबत देखील लवकरच व्यापारी संघटनांसोबत चर्चा करून, बाजार समितीच्या उत्पन्नाबरोबरच व्यापार वृद्धी कशी होईल, याबाबत कार्यवाही केली जाईल. असेही गरड यांनी सांगितले. 

वादग्रस्त निर्णयांना स्थगिती  माजी प्रशासकांनी घेतलेल्या आणि चौकशी सुरू असलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली असून, प्राधान्यक्रम आणि अत्यावश्‍यक कामांची माहिती घेऊन कामे केली जातील. याबाबत शासनाचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही गरड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT