पडसाळी येथे द्राक्षाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीसाठी रॅकवर टाकलेला बेदाणा.
पडसाळी येथे द्राक्षाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीसाठी रॅकवर टाकलेला बेदाणा. 
मुख्य बातम्या

सोलापुरातील शेतकरी निवडताहेत बेदाण्याचा पर्याय

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या तो अडचणीत आला आहे. खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने द्राक्षांना उठाव मिळत नाही. आजही २५ टक्के द्राक्ष शिवारात आहेत. परिणामी, आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेले द्राक्ष उत्पादक आता या नव्या समस्येमुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पण अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आता बेदाणा निर्मितीचा पर्याय निवडला आहे.  

जिल्ह्यात जवळपास २५ हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जाते. त्यापैकी ३० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष बेदाण्यासाठी जातात. २० टक्के द्राक्षे निर्यात आणि उर्वरित द्राक्षे देशातंर्गत बाजारात जातात. पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांत द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. अगदी पंधरवड्यापूर्वी वातावरण खूप चांगले होते. बाजारपेठेत द्राक्षाला चांगला उठाव मिळत होता. गेल्या महिन्यात प्रतिकिलो ४० ते ४५ रुपयांप्रमाणे विक्री होणाऱ्या द्राक्षांचे दर या आठवड्यात मात्र जवळपास निम्म्याने उतरले.

आज कोरोनाचा धोका वाढत असल्याने शेतापर्यंत येणाऱ्या खरेदीदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. शिवाय स्वतः शेतकऱ्यांनाही वाहन करुन बाजारात द्राक्षे पाठवणे शक्य नाही. कारण, पुणे, मुंबई या खात्रीशीर बाजारपेठाही विस्कळीत झाल्या आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे काही भागांत द्राक्षांचे नुकसान झाल्यानेही फटका बसला. आता पुन्हा ‘कोरोना’चा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती गंभीर होत चालल्याने शेतकऱ्यांची अधिकच कोंडी होऊन बसली आहे. यावर मार्ग म्हणून शेतकरी आता ही द्राक्षे बेदाण्यासाठी नेत आहेत. सद्यःस्थितीत बेदाणा निर्मिती हाच एकमेव उपाय त्यांच्यासमोर आहे.

बेदाण्यासाठी रॅक मिळेना द्राक्षासाठी खरेदीदार मिळत नसल्याने शेतकरी बेदाण्याकडे वळत असले, तरी तिथेही अडचण होऊन बसली आहे. एकाचवेळी शेतकरी बेदाण्याकडे वळत असल्याने बेदाणा निर्मितीसाठी असलेले रॅक उपलब्ध होत नाहीत. एकीकडे बागेत झाडांवर द्राक्षे ठेवता येत नाहीत आणि दुसरीकडे बेदाण्यासाठी द्राक्ष न्यावी, तर रॅक उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT