संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कर्जमाफी योजनेतील नगरमधील अडीच लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध 

निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रमाणीकरणासाठी दोन हजार बायोमेट्रिक मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन बांधील आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन

नगर  ः आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध करण्याला निवडणूक आयोगाने अखेर हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे जिल्ह्यातील १५९८ गावांमधील दोन लाख ५३ हजार ४५५ कर्जखात्यांच्या याद्या प्रशासनाने शनिवारी प्रसिद्ध केल्या. ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या नगर तालुक्‍यातील विळद व पिंप्री घुमट या गावांना आचारसंहितेचा अडथळा आल्याने त्यांना मात्र तूर्तास वगळले आहे. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रशासनाने शनिवारी याद्या प्रसिद्ध करून कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ अखेरच्या थकित व पुनर्गठित केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफी दिली जात आहे. ही आधार बेस योजना असल्याने आधार प्रमाणीकरण करून शेतकऱ्यांना योजनेचा थेट लाभ दिला जात आहे. मागील साडेतीन महिन्यांपासून महसूल व सहकार प्रशासनाकडून कर्जमाफी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शासन निर्देशानुसार तलाठी, ग्रामपंचायत, जिल्हा बॅंक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आधार प्रमाणीकरणात राज्यात पहिला बहुमान नगर जिल्ह्याला मिळाला.

जिल्ह्यात आजअखेर ९५१ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यातून नगर तालुक्‍यातील जखणगाव आणि राहुरी तालुक्‍यातील ब्राह्मणी या गावांतील ७८७ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पाच कोटी ४२ लाख ४२ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यातील कर्ज खात्यांची एकूण संख्या तीन लाख ५४ हजार १८० आहे. पात्र शेतकऱ्यांची संख्या दोन लाख ६० हजार ६०४ आहे. सर्व कर्ज खात्यांकडे असलेली एकूण रक्कम दोन हजार २९६ कोटी आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT