नाशिक बाजारसमितीच्या सभापतीपदी संपतराव सकाळे यांची निवड
नाशिक बाजारसमितीच्या सभापतीपदी संपतराव सकाळे यांची निवड 
मुख्य बातम्या

नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी संपतराव सकाळे

टीम अॅग्रोवन

नाशिक  : नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांची बुधवारी (ता. ११) बिनविरोध निवड झाली. श्री. सकाळे यांना संचालकांनी पाठबळ दिल्याने त्यांचे बाजार समितीतील राजकीय वजन सिद्ध झाले असून, माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना जोरदार धक्का दिला आहे.

शिवसेनेचे बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना नोकरभरतीत लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांचे अधिकार सहकार विभागाने काढले होते. संचालकांनी पत्र दिल्यानंतर हे अधिकार कॉंग्रेसचे संपतराव सकाळे यांच्याकडे आले होते. त्यामुळे चुंभळे आणि सकाळे यांच्यामध्ये मोठा वाद उफाळून आला होता. 

गेल्या तीन महिन्यांनापासून सुरु असलेली राजकीय चढाओढ संपून श्री. सकाळे यांची सरशी झाली आहे. त्यामुळे चुंभळे यात एकाकी पडले. उपविभागीय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सभापतीपदासाठी निवडणूक झाली. त्यात सभापतीपदासाठी श्री. सकाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सर्व पंधरा संचालकांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे श्री. सकाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT