संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कर्जमाफीची दुसरी यादी उद्या

टीम अॅग्रोवन

सोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध झाली. आता सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. २८) प्रसिद्ध केली जाणार आहे. 

दरम्यान, पोर्टलवर याद्या अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने याद्या प्रसिध्दीस विलंब होत आहे. याद्या अपलोड होतील तसा लाभ देण्यात येत असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा बॅंका आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील ३४ लाख शेतकरी या कर्जमाफीस पात्र ठरले असून, त्यामध्ये १८ लाख शेतकरी जिल्हा बॅंकांमधील आहेत. बॅंकांकडून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांची माहिती सहकार विभागाने संकलित केली असून आता आधार प्रमाणिकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ३५ टक्‍क्‍यांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतही त्रुटी असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. आपले सरकार सेवा केंद्रातून त्यात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. राज्यातील ६८ गावांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.   ठळक बाबी...

  • तिसऱ्या अन्‌ चौथ्या यादीत पाच लाखांपर्यंत शेतकऱ्यांचा असणार समावेश.
  • सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला होणार प्रसिद्ध.
  • कर्जमाफीच्या पोर्टलवर याद्यांचा बोजा : तांत्रिक अडथळ्यांमुळे अपलोडिंगला विलंब.
  • दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या ३४ लाख शेतकऱ्यांना तीन महिन्यांत लाभ देण्याचे नियोजन.
  •  १० मार्चपर्यंत तिसरी यादी प्रसिद्ध करण्याचे सहकार विभागाचे नियोजन.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT