संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात ‘रोहयो’ची अडीच हजार कामे सुरु

टीम अॅग्रोवन

नगर  ः मागेल त्याला काम देण्यासाठी जिल्हाभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची २४८१ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याद्वारे ११ हजार ६८२ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रशासनाने २७ हजार ९३८ कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामांद्वारे ८८ लाख तीन हजार दिवसांचा रोजगार मिळणे शक्य आहे.

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या स्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची पूर्ण तयारी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायतींची १६२३ व इतर यंत्रणांची ८५८ अशी २४८१ कामे सुरू करण्यात आली. यावर ११ हजार ६८२ जणांना रोजगार उपलब्ध झाला.

या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरास सरासरी दोनशे सहा रुपये मजुरी प्रतिदिवस मिळत आहे. वृक्षसंगोपन, संवर्धन, निगराणी आदी रोजंदारीच्या कामांबरोबरच ब्रासवर केल्या जाणाऱ्या कामांचा यात समावेश आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींची १८ हजार ७११ कामे, तसेच इतर यंत्रणांतर्फे ९२१४, अशी एकूण २७ हजार ९२५ कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामांतून जिल्हाभरात ८८ लाख तीन हजार दिवसांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जिल्ह्यात ‘कोरोना’चे सावट असतानाही मागेल त्याला काम देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले. रोजगार हमी योजनेच्या कामांची अंमलबजावणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केली जात आहे.

तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती ः अकोले ९१९, जामखेड ६९४, कर्जत १४८५, कोपरगाव २३२, नगर ८२५, नेवासे ८२५, पारनेर १०५०, पाथर्डी १०१६, राहाता ७४८, राहुरी ५१६, संगमनेर ९६७, शेवगाव ९०६, श्रीगोंदे ९०७,श्रीरामपूर ६१२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT