संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

लातूर कृषी विभागातील बदल्यांची दोन दिवसांत चौकशी ः कृषी आयुक्त

हरि तुगावकर

लातूर : लातूर कृषी विभागातील बदल्यांच्या संदर्भात सर्व फाईल्स कृषी आयुक्त कार्यालयात मागवण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत त्यांची सर्व तपासणी करण्यात येईल. या सर्व प्रकरणाची चौकशी करून शनिवारपर्यंत अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिली.

लातूर कृषी विभागातील बदल्यांचे प्रकरण `ॲग्रोवन`ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन सोमवारीच कृषी सचिव एकनाथ डवले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांना दिले होते. बदल्यांच्या बाबतीतील हे प्रकरण गंभीर आहे. या बदल्यांच्या संदर्भातील सर्व रेकॉर्ड घेऊन कृषी सहसंचालकांना कृषी आयुक्त कार्यालयात बोलावले होते. पण ते दोन दिवस रजेवर होते.

या प्रकरणातील सर्व फाईल्स मागवण्यात आल्या आहेत. यात काय काय अनियमितता झाली आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. याचा सविस्तर अहवाल शनिवारपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे. यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आपण शासनाला करणार असल्याची माहिती धीरज कुमार यांनी `ॲग्रोवन`शी बोलताना दिली.

महिला कर्मचाऱ्याने घेतला आक्षेप सेवा ज्येष्ठता डावलून बदलीत न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना पसंती दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर या विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने नागरी सेवा मंडळावरच आक्षेप घेतला आहे. तसे लेखी पत्र या महिला कर्मचाऱ्याने मंगळवारी (ता. १८) कृषी आयुक्त व कृषी सहसंचालकांना दिले आहे. 

मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लातूर कृषी विभागात सुरू असलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत अनियमितता व मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. विभागातील कर्मचाऱ्यांना वेठीस धरून आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे, या बदल्यांना स्थगिती देऊन चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT