पालकमंत्री हसन मुश्रीफ 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : मंत्री हसन मुश्रीफ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार २२१ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासन निश्‍चितपणे दिलासा देणार आहे. - हसन मुश्रीफ, पालकमंत्री, नगर.

टीम अॅग्रोवन

नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे गावांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या मदतीने निश्‍चित प्रयत्न करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री व नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  

प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी (ता.२६) नगर येथील पोलिस परेड मैदानावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील या वेळी उपस्थित होते. पोलिस दलाच्या पथकाने या वेळी मानवंदना दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, की पशुधनाच्या आरोग्यासाठी लवकरच फिरते पशू चिकित्सालय सुरू केले जाईल. ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण, संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत व्यापक सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने (स्व.) आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना आपण राबविणार आहोत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यात ३४८ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. 

ध्वजवंदनानंतर पालकमंत्री मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पोलिस दलाच्या व्यायामशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रारंभी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT