संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

टीम अॅग्रोवन

पुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वत्र लॉकडाउन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद आहे. यामध्ये इंदापूर तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणाची मच्छीमार्केट बंद आहेत. यामुळे उजनी धरणात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने त्यावर उपजीविका करणारे मच्छीमार अडचणीत आले आहेत.

पुणे व नगर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या काठावरील पळसदेव, डाळज क्र. एक, दोन, तीन, भादलवाडी, कुंभारगाव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ, खानवटे, राजेगाव, खेडनगर, गणेशवाडी, बाभुळगाव, कात्रज, कोंढार चिंचोली, पोमलवाडी आदी गावांमधील अनेक मच्छीमार उजनीत मासेमारी करून आपली गुजराण करतात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मासळी बाजार २० मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने घेण्यात आला आहे. सध्या येथे २० ते २५ अडतदार आहेत. अनेक ठिकाणांहून येथे मासे विक्रीसाठी येतात. त्यामुळे दररोज येथे पाच ते सहा टन मासळीची आवक होत असते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता मासळी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट बंद असल्याने मासेमारी सध्या ठप्प आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणारा पैसा मिळवायचा कुठून असा प्रश्न या मच्छीमारांसमोर उभा राहिला आहे. 

याबाबत स्थानिक मच्छीमार बापूराव नगरे म्हणाले, की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मासळी बाजार बंदचा निर्णय घेतला आहे. तो सर्वांना मान्य आहे. परंतु, पंधरा दिवस बाजार बंद राहिल्याने मच्छीमारी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बाजार समितीने लवकर निर्णय घेऊन मार्केट सुरू करावे.    इंदापूरतील मार्केटमध्ये चिलापी माशाला अधिक मागणी आहे. मी रोज ५० ते ६० किलो माशांची विक्री करत होतो. चांगला दर मिळाल्यास चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु, पंधरा दिवसांपासून भिगवण व इंदापूर दोन्ही मच्छिमार्केट बंद असल्याने आमच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत, असे मत्स्य व्यावसायिक  नितीन रामकिसन नगरे यांनी सांगितले.

तालुक्यात भिगवण व इंदापूर ही दोन्ही मच्छीमार्केट राज्यात प्रसिद्ध आहेत.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर २० मार्चपासून मच्छिमार्केट बंद आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत, इंदापूर बाजार समितीचे सहाय्यक सचिव  वैभव दोशी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT