संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

दूध भुकटी योजनेला दोन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: राज्यात अतिरिक्त दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला दोन महिन्यांची म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (ता.२६) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

टीम अॅग्रोवन

मुंबई: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाउन कालावधीत दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला दोन महिन्यांची म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (ता.२६) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने या महिन्यात राज्यातील पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तसेच दररोज दहा लाख लिटर दुधाचे रूपांतरण भुकटीत करण्याच्या योजनेलाही एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला होता.

शासनाने एप्रिल २०२० पासून प्रतिदिन अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी १० लाख लिटर दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना सुरू केली. सुरुवातीला ही योजना एप्रिल व  मे या दोन महिन्यांसाठी राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र राज्यातील अतिरिक्त दुधाची परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. तसेच राज्यात दूध दरवाढीवरून राजकारण अजूनही तापलेले आहे. दुधाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष अजूनही आक्रमक आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस आता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन घेाषित केला होता. राज्यानेही १९ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊनमध्ये बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत झालेली घट तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टान्न निर्मिती केंद्रे बंद झाल्यामुळे राज्यातील दैनंदिन दुधाची विक्री सर्वसाधारण १७ लाख लिटरने कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT