अवकाळी पाऊस, गारपीटीने पिकांचे झालेले नुकसान 
मुख्य बातम्या

फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट; पिकांना फटका

औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी (ता. २९) वादळी वारे, गारांसह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा फळपिकांसह उशिराने पेरणी झालेल्या रब्बी पिकांना दणका दिला आहे.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी (ता. २९) वादळी वारे, गारांसह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा फळपिकांसह उशिराने पेरणी झालेल्या रब्बी पिकांना दणका दिला आहे.  

जालना जिल्ह्यातील मंठा, वाटुर, घनसावंगी, बदनापूर, वालसावंगी, शहागड भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते, सावखेडा, वजीरखेडा, पिंप्रीसह राजूर परिसरात रविवारी सायंकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते,  सावखेडा, वजीरखेडा, पिंप्रीसह राजूर परिसरात वादळी वारा, गारांसह जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील गहू, मका, बाजरी,आंबा मोहोरालाही फटका बसला. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची धावपळ उडाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पिंप्री, नेवरगाव, लोहगाव, जायकवाडी, पाचोड, ढोरकीन व टाकळी कोलते (ता.फुलंब्री) येथे  रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. टाकळी कोलते (ता.फुलंब्री) येथे जवळपास पाऊण तास गारांसह पाऊस पडल्याने गहू, मका, बाजरी, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय जोरदार वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT