गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा विभागात गर्दी शिवाय सोमवारी (ता.६) व्यवहार सुरळीत सुरु होते.
गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा विभागात गर्दी शिवाय सोमवारी (ता.६) व्यवहार सुरळीत सुरु होते. 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीत १८ हजार क्विंटल शेतीमालाची आवक

टीम अॅग्रोवन

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.६) कांदा, बटाटा आणि फळांची लहान, मोठ्या ५५७ वाहनांमधून सुमारे १८ हजार ८०० क्विंटल आवक झाली. मोशी आणि खडकी उपबाजारात जास्त गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी बाजार बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. 

लॉकडाऊनमध्ये शेतीमालास उठाव मिळण्याबरोबरच ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल मिळावा, यासाठी गेल्या १० दिवसांपासून साप्ताहिक सुट्टी वगळता चक्राकार पद्धतीने बाजार आवार सुरु आहे. रविवारी (ता.५) भुसार बाजारात काही किरकोळ व्यापारी शेतीमाल विक्री करत असताना, सामाजिक अंतर राखत नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे. 

बाजार आवारात कर्तव्यावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता जागेवरच नाष्टा आणि पाणी देण्याची सुविधा मंगळवारपासून (ता.७) देण्यात येणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT