Die uncertainty of rain the onion and pulses found in danger
Die uncertainty of rain the onion and pulses found in danger 
मुख्य बातम्या

अलिबाग :कांदा, वाल, मुगाचे पीक अडचणीत

टीम अॅग्रोवन

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कापणीची कामे संपली आहेत. आता रब्बी हंगामात सफेद कांदा, वाल, मूग आदी पिकांची लागवड करण्यास सुरवात झाली. याचदरम्यान भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसतो. पावसाने हजेरी लावल्यास आंब्याची पालवी कुजून मोहर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडेल. त्याचा परिणाम आंब्यावर मावा अथवा तुडतुड्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. 

भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. अरबी समुद्रात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेले आहे. यानंतर आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभे राहिले आहे. या ठिकाणीदेखील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील २४ तासांत याची तीव्रता वाढणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. 

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कापणी केलेल्या तसेच रचून ठेवलेल्या भाताची रोपे भिजून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीबरोबर भात झोडणीची कामे वेगात सुरू केली आहेत. जिल्ह्यात कापणीची कामे संपल्यानंतर रब्बी हंगामात सफेद कांदा, वाल, मूग आदी पिकांची लागवड करण्यास सुरवात झाली आहे. या पिकांना अवकाळी पावसामुळे फटक बसू शकतो. तसेच आंब्याला आलेली पालवी कुजून जाईल. मोहर येण्याची प्रक्रिया यामुळे लांबणीवर पडेल. त्याचा परिणाम आंब्यावर मावा अथवा तुडतुड्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

अलिबागसह रोहा तालुक्यात सफेद कांद्याची लागवड करण्यास सुरवात केली आहे. सर्वांत जास्त सफेद कांद्याची लागवड ही अलिबाग तालुक्यातील खंडाळे, कार्ले परिसरात मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस पडल्यास कांद्याच्या रोपांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होणार नाही. यासाठी हे पोषक आहे; मात्र कापणी केलेले भात पीक झाकून ठेवणे आवश्यक आहे. 

- उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधिकारी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT