Crop Damage Compensation  Agrowon
मुख्य बातम्या

Crop Damage Compensation : ई-केवायसी नसल्याने अवकाळीची नुकसानभरपाई मिळेना

Maharashtra Crop Damage : राज्यात गेल्या हंगामात सतत पाऊस झाल्याने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासकीय यंत्रणांनी पंचनामेही केले. मदतीची घोषणा होऊन बरेच दिवस लोटले. पण अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने नुकसान भरपाई मिळण्यात अडचण निर्माण होत आहे.

Team Agrowon

Maharashtra Farmer Compensation : मागील वर्षी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे राज्यातील हजारो हेक्टरवरील हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. दरम्यान, शासनाच्यावतीने सुधारित दराने तात्काळ मदत देण्याची घोषणा केली. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी (E-KYC) न केल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्या नाहीत.

मागील हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर व चालू वर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या शेतपीके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतपीकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.

महसूल व कृषी विभागाकडून शेतपीकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाला पाठविण्यात आला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घेण्यात निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १ हजार ५०० कोटींच्या निधीला मान्यताही मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

शेतपीकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालये, तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.  परंतु अनेक बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केल्या नाहीत, अशा  शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा झाली नाही.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT