Nashik Onion farmer Agrowon
मुख्य बातम्या

Onion Traders Strike: नाशिकमध्ये सरकारच्या विरोधात घोषणा; लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बैठक

Nashik Onion Market: नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी लिलाव बंद केल्याने बाजार समितीमध्ये शुकशुकाट आहे. आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली.

Swapnil Shinde

Lasalgaon market : कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क हटविणे आणि नाफेड-एनसीसीएफच्या कांद्याची विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनकडून लिलाव बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमधील कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान, आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची लासलगाव बाजार समितीमध्ये बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटविण्यात यावे आणि नाफेड-एनसीसीएफचा कांदा बंद केला जावा, या प्रमुख मागण्यांसह कांदा व्यापारी असोसिएशनकडून लिलाव बंद पुकारण्यात आला आहे. सरकारच्यावतीने पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, तोडगा निघून शकल नाही. लिलाव बंद झाल्यापासून सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल ठप्प झाली आहे.

लिलाव बंद असल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समिती आणि उपसमितीमध्ये कांद्याचे व्यवहार बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज लासलगाव बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारने तातडीने कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क हटवण्यात यावे, अशी मागणी केली. या प्रश्नावर कांदा व्यापाऱ्यांची मंगळवारी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी बैठक होणार आहे. यामध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT