गाय दुधाचे गुणप्रत निकष बदलले
गाय दुधाचे गुणप्रत निकष बदलले 
मुख्य बातम्या

गाय दुधाचे गुणप्रत निकष बदलले

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या गुणप्रतीचे निकष शासनाने बदलले आहेत. यापुढे ३.२ टक्के फॅट आणि ८.३ टक्के एसएनएफ असलेले गाय दूध प्रतिलिटर २६.१० रुपये दराने खरेदी केले जाणार आहे.  दूध उत्पादक कल्याणकारी संघाने राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या शेतकऱ्यांकडून गाय दुधाची खरेदी करताना ३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ असावा, असा नियम आहे. तसेच, गाय दूध २७ प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचे आदेश आहेत. शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करताना फॅट आणि एसएनएफचे निकष काटेकोरपणे पाहिले जातात, मात्र भाव दिला जात नाही. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्याची मागणी वारंवार राज्य शासनाकडे केली जात होती.  ‘‘राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या समितीने गुणप्रत बदलण्याची शिफारस केली होती. ती आता स्वीकारण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळू शकेल,’’ अशी माहिती दुग्धविकास विभागाच्या सूत्रांनी दिली.  टोन्ड दूध बंद करा ः डेरे  शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबविण्यासाठी शासनाने उशिरा की होईना हा निर्णय घेतल्यामुळे दूध उत्पादक या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. तथापि आता टोन्ड दुधाचा प्रकार बंद करण्याची गरज आहे, असे मत दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केले.  दर्जा सुधारण्याची गरज होती ः कुतवळ राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की कमी गुणप्रतीचे दूध कायदेशीरदृष्ट्या स्वीकारणे यामुळे सोपे झाले आहे. मात्र, दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज होती. कमी दर्जाचे दूध चांगले आहे असे समजून हा निर्णय झाला असला तरी त्यामुळे गैरप्रवृत्तींचे फावणार आहे. अशी राहील गाय दुधाची सुधारित गुणप्रत व नवे दर

फॅट एसएनएफ   दर प्रतिलिटर रुपये
३.२    ८.३  २६.१०
 ३.३     ८.३   २६.४०
३.४   ८.३  २६.७०
३.५   ८.३    २७.००
३.६   ८.३   २७.३०
३.७   ८.३ २७.६०
३.८   ८.३  २७.९०
३.९     ८.३    २८.२०
४.०     ८.३   २८.५०
४.१  ८.३  २८.८०
४.२    ८.३    २९.१०
४.३   ८.३  २९.४०
४.४  ८.३  २९.७०
४.५   ८.३      ३०.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT