कर्जमाफी अर्ज प्रक्रिया मुदतवाढ
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया मुदतवाढ 
मुख्य बातम्या

कर्जमाफीचे अर्जासाठी २२ पर्यत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. शेतकऱ्यांच्या सोईसाठी ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता दिनांक २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.

आजपर्यंत ९६ लाख ५९ हजार ७४० अर्जाची नोंदणी झाली असून ४९ लाख ५६ हजार ३०५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.कर्ज माफीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत या आधी १५ सप्टेंबर होती. अजून अनेक शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याचे बाकी असल्याचे लक्षात आल्यानंतर, या शेतकऱ्यांच्या सोईसाठी ही मुदतवाढ २२ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT