पीकविमा नुकसानभरपाईचे ७४७ कोटी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांत
पीकविमा नुकसानभरपाईचे ७४७ कोटी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांत 
मुख्य बातम्या

पीकविमा नुकसानभरपाईचे ७४७ कोटी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांत

टीम अॅग्रोवन

पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेतून गेल्या खरिपातील पीकविमा भरपाईपोटी एक हजार ८८२ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. त्यापैकी ७४७ कोटी रुपये डीबीटीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाले आहेत. तर काही कंपन्यांकडून २१ लाख शेतकऱ्यांसाठी ११३५ कोटी बॅंकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होणार आहे. पीकविमा योजनेतून खरीप २०१७ मधील हंगामातील नुकसान भरपाई वाटपाचे काम बॅंकांच्या पातळीवर सुरू आहे. काही बॅंकांकडून विम्याच्या रकमा थेट कर्जखाती भरून घेतल्या जात असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत.  भारतीय कृषी विमा कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अशा पाच विमा कंपन्यांनी गेल्या खरिपात शेतकऱ्यांकडून विमाहप्ता गोळा केला होता. शासनाकडूनदेखील हप्त्यापोटी या कंपन्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. या कंपन्यांनी एकूण किती रक्कम गोळा केली व किती वाटप होत आहे याविषयीची अंतिम माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.   ‘‘विमा कंपन्यांमार्फत गेल्या खरिपातील नुकसान भरपाई निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हजार ८८२ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. ऐन खरिपात शेतकऱ्यांच्या हाती विमा कंपन्यांकडून भरपाईच्या रकमा दिल्या जात असल्याने त्याचा उपयोग चालू खरिपातील कामांसाठी करता येईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  विमा कंपन्यांना भरपाईच्या रकमा अदा करूनही बॅंकांकडून रकमा दाबून ठेवल्या जातात. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना डीबीटीने भरपाई देण्याचा प्रयत्न झाला आहे. १२ लाख ६२ हजार शेतकऱ्यांना डीबीटीतून ७४७ कोटी २८ लाख रुपये थेट बॅंक खात्यात उपलब्ध झाले आहेत.  राज्यातील २१ लाख ३५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत एक हजार १३५ कोटी रुपये कोटी बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. बँकनिहाय वितरीत करण्यात आलेल्या निधीचा शेतकरीनिहाय तपशिल कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.  संबंधित बॅंकामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत नुकसान भरपाई जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही समस्या असल्यास संबंधित विमा कंपनी किंवा कृषी खात्याशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT