मागील सरकारचे कर्जमाफीचे ४०० कोटी कुठे गेले?
मागील सरकारचे कर्जमाफीचे ४०० कोटी कुठे गेले?  
मुख्य बातम्या

मागील सरकारचे कर्जमाफीचे ४०० कोटी कुठे गेले? : भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचे ठरवले. त्याचा नाशिकमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त खातेदारांना फायदा होईल. गेल्यावर्षी ६०० कोटी आले, त्यातील २०० कोटी वाटले. बाकी कर्जमाफीचे ४०० कोटी कुठे गेले माहीत नाही? असा टोला ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना लगावला. पण तसे आता होता कामा नये, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा व्हावे, त्याला फाटा फुटता कामा नये, असे भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.  नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गुरुवार (ता. २६) श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. खा. संजय राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी ग्रामविकास राज्यमंत्री आमदार दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सुहास कांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माजी खासदार समीर भुजबळ, निर्मला गावीत, भाऊ चौधरी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांच्यासह सर्व सभापती, सदस्य उपस्थित होते. खासदार संजय राऊत म्हणाले, ६ महिन्यांत सरकार जाईल वगैरे वगैरे या नुसत्या गप्पा आहे. सरकाराला काही भीती नसून पुढचे ५ काय २५ वर्षे महाआघाडीचे सरकार राहील, यात तिळमात्र शंका नाही. एवढेच नव्हे तर देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्यासाठी आपली साथ हवी असल्याचे आवाहन त्यांनी केले.  अध्यक्षा शीतल सांगळे यांनी प्रास्ताविकातून या प्रशासकीय इमारतीचे वैशिष्ट सांगत भविष्यात निधी कमी पडू न देऊ नये, अशी विनंतीवर सूचना मांडली.  एस. भुवनेश्‍वरी यांनी स्वागत केले. अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी इमारती मागील संकल्पना सांगितली. उपाध्यक्षा व सभापती नयना गावीत, सभापती यतींद्र पाटील, सुनिता चारोस्कर, अर्पणा खोसकर, गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षिरसागर, उदय जाधव, यशवंत गवळी आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT