ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून शेतकरीपुत्राने साकारले शरद पवार
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून शेतकरीपुत्राने साकारले शरद पवार 
मुख्य बातम्या

ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून शेतकरीपुत्राने साकारले शरद पवार

जगदीशचंद्र जोशी

शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब) या गावी मंगेश निपाणीकर या शेतकरीपुत्राने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (१२ डिसेंबर) अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मंगेश निपाणीकर यांनी निपाणी येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच सुरेश आणि शरद पाटील निपाणीकर या दोन भावांच्या साडेचार एकर क्षेत्रावर हरभरा, आळीव, मेथी, ज्वारी, गहू या पिकापासून ग्रास पेंटिंगच्या माध्यमातून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साकारले आहेत. आजपर्यंत आपल्या नेत्याबद्दल प्रेम व्यक्त करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहिले असतील. पण मंगेशच्या या कल्पनेने सगळेच भारावून गेले आहेत. मंगेशने सातत्याने पंधरा दिवस राबून शरद पवार यांचे ग्रास पेंटिंग साकारले. विशेष म्हणजे हे जगातील सगळ्यात मोठे ग्रास पेंटिंग आहे. ‘शरद पवार यांनी आपल्या बांधावर यावे’, हीच या शेतकरीपुत्राची व ग्रामस्थांची इच्छा आहे. ‘साहेब, आम्ही आपली आतुरतेने वाट पाहतोय,’ अशी साद शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यामार्फत या तरुणाने घातली आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी आणि या कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी श्री. पवार मंगळवारी (ता. १७) निपाणी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी सरपंच सुरेश पाटील निपाणीकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT