संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज ः जिचकार 
मुख्य बातम्या

संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज ः जिचकार

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा उत्पादनासाठी पुढाकार घेत देशाअंतर्गत आणि देशाबाहेर मार्केटिंगसाठी शेतकरी कंपन्यांच्या मार्फत जाळे विणले पाहिजे. त्यासाठी अपेडा तसेच पणन मंडळाने शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनीचे रमेश जिचकार यांनी व्यक्‍त केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाच्या वतीने वरुड येथील बाजार समितीत आयोजित फळे व भाजीपाला विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, तालुका कृषी अधिकारी यु.आर. आगरकर,साहाय्यक निबंधक श्रीमती धोपे, बाजार समिती उपसभापती अनिल गुल्हाने, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाबाराव बहुरूपी, प्रकाश वानखडे, अक्षय ठाकरे, अनूप फरकाडे यांची या वेळी उपस्थिती होती. रमेश जिचकार  म्हणाले, निर्यातक्षम संत्रा उत्पादनकाळाची गरज आहे. त्याकरिता फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पूरक प्रयत्न करावे लागतील. त्याकरिता आवश्‍यक ते तंत्रज्ञान संशोधन संस्थांनी दिले पाहिजे. नवीन वाणांची देखील गरज असून त्यासाठी देखील संशोधक संस्थांच्या पुढाकाराचीच गरज आहे.  द्राक्षाप्रमाणे संत्र्यांची देखील विविध वाणनिर्मिती येत्या काळात झाल्यास संत्रा उत्पादकांचे व्यापक हित साधले जाईल. पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक महादेव बरडे यांनी मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यासोबत प्रा.महल्ले, प्रा. साबळे यांनी संत्रा, मोसंबी व भेंडी पिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT