'शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या' 
मुख्य बातम्या

शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या : शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व पपई ही महत्त्वाची नगदी पिके आहेत. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, ते शेतकरी या पिकांच्या माध्यमातून आपले अर्थचक्र चालवितात. परंतु, यंदा या तिन्ही पिकांचे दर टिकून आहेत. कांद्याचे दर विक्रमी स्थितीत आहेत. यामुळे या पिकांच्या शिवार किंवा खेडा खरेदीकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिवार खरेदीकडे बाजार समित्यांचे लक्ष नसल्याने दर कमी देण्याचे प्रकारही होतात. पपई, कांद्याचे दर रोज खरेदीपूर्वी जाहीर होत नाहीत. केळीचे दर खरेदीपूर्वी रोज जाहीर केले जातात. मग या दरात केळीची खरेदी केली जाते. केळीचे दर रोज जाहीर होतात. तसे दर शिवार खरेदीसंबंधी कांदा व पपईबाबत जाहीर केले जात नसल्याने व्यापारी सांगतील, त्या दरात खरेदी केली जाते. यात केळीचे जे दर जाहीर होतात, त्या दरात सध्या खरेदी केली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. क्विंटलमागे १०० ते १५० रुपये कमी दर जाहीर दरांपेक्षा केळीच्या शिवार खरेदीमध्ये शेतकऱ्यांना दिले जात आहेत.  यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु, बाजार समित्या कारवाई करीत नाहीत. कुठेही भरारी पथके नाहीत. केळी, पपई व कांद्याचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर व पाचोरा या भागांत अधिक घेतले जाते. तर धुळ्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमध्ये तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात केळी, कांदा व पपईचे पीक अधिक असते. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधील खरेदीदारांचे एजंट सर्रास खरेदी करतात. बाजार समितीचे शुल्क बुडविले जाते. अनेकदा खरेदी करून एजंट पोबारा करतात. अनेक शेतकऱ्यांची वित्तीय लूट, फसवणूक मागील चार-पाच वर्षांत रावेर, यावल, शहादा, शिरपूर, धुळे, जामनेर, जळगाव भागांत झाली आहे. परंतु, फसवणूक करणाऱ्यांवर बाजार समित्या, पोलिसांनी कारवाई केलेली नाही. यामुळे शिवार खरेदीवर लक्ष असावे. भरारी पथकांची नियुक्ती प्रमुख बाजार समित्यांनी करावी, अशी मागणी शेतकरी दीपक पाटील (चोपडा) यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

Ginger Rate : आले दरात पंधरा दिवसांत चार ते पाच हजारांची घट

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा इशारा

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT