बुलडाणा ः कृषी विभागाच्या उन्नत शेती- समृद्ध शेतकरी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (सन २०१८-१९) अंतर्गत मिनी ट्रॅक्टर घेतले, कुणी रोटाव्हेटर, कुणी कल्टीव्हेटर, पीव्हीसीपाइप घेतले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना तीन महिन्यांपासून अनुदान भेटलेले नसल्याने ते सारखे बुलड
बुलडाणा ः कृषी विभागाच्या उन्नत शेती- समृद्ध शेतकरी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (सन २०१८-१९) अंतर्गत मिनी ट्रॅक्टर घेतले, कुणी रोटाव्हेटर, कुणी कल्टीव्हेटर, पीव्हीसीपाइप घेतले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना तीन महिन्यांपासून अनुदान भेटलेले नसल्याने ते सारखे बुलड 
मुख्य बातम्या

बुलडाणा : कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः कृषी विभागाच्या उन्नत शेती- समृद्ध शेतकरी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (सन २०१८-१९) अंतर्गत मिनी ट्रॅक्टर घेतले, कुणी रोटाव्हेटर, कुणी कल्टीव्हेटर, पीव्हीसीपाइप घेतले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना तीन महिन्यांपासून अनुदान भेटलेले नसल्याने ते सारखे बुलडाण्याला चौकशीसाठी ये-जा  करीत आहोत. परंतु अनुदान कधी येईल हे कोणीही निश्चित सांगत नाही. प्रक्रीया सुरू आहे, पुढच्या आठवड्यात येईल, अशी उत्तरे मिळत आहेत. अनुदान भेटले असते तर किमान पेरणीसाठी बी-बियाणे, खते घेता आली असती, असे हे शेतकरी आता हताशपणे बोलत आहेत.   बुलडाणा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांनी मिनी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, सीड ड्रील, श्रेडर, थ्रेशर, पीव्हीसी पाइप, इतर यंत्रे घेतली. मार्च महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दिले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत हे प्रस्ताव जिल्ह्याला गेले. मात्र आता जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी होत असतानाही अनुदान मिळालेले नाही. अनेकांनी हात उसनवारी करून यंत्रांसाठी पैशांचा भरणा केला. अनुदान मिळाल्यानंतर हे हात उसनवारीचे पैसे परत देऊ या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांवर आता व्याजाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकरी अनुदानासाठी फेऱ्या मारत आहेत. अशा स्थितीत पैसे मिळणे तर दूरच उलट खर्चच होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. अनुदानासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत बुलढाणा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पाठवून तीन महिने लोटले आहेत. परंतु बुलढाणा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अनुदान बंँकेत जमा करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहेत. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस हे कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यासाठी मलकापूर येथे येत असल्याने अनुदानापासून वंचित असलेले अनेक शेतकरी त्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांबाबत आपली तक्रार सविस्तर देणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

अनुदानाकडे डोळे माझ्या काकूच्या नावाने मिनी ट्रॅक्टर घेतले आहे. याचे अनुदान कधी मिळेल यासाठी बुलडाण्याला प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. अनुदान येईल, पुढच्या आठ दिवसांत येईल, प्रोसेस सुरू आहे असे अधिकारी सांगून वेळ मारतात. आता हे अनुदान भेटले असते तर पेरणीसाठी हा पैसा कामात आला असता. परंतु, कुठलाही अधिकारी गांभिर्याने याकडे बघायला तयार नाही, असे एका शेतकऱ्याने ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

अडथळे आणण्याचा काही प्रश्नच नाही. अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा आणला जात नाही. बँक खात्यांबाबत ज्या काही अडचणी आलेल्या आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संबंधित शेतकऱ्यांची यादी पाठविण्यात आलेली आहे.  - नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलाडणा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT