उजनी धरण अद्यापही उणे पातळीतच  
मुख्य बातम्या

उजनी धरण अद्यापही उणे पातळीतच 

पुरेशा पावसाअभावी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण अद्यापही उणे पातळीत आहे. बुधवारी (ता.२१) दुपारपर्यंत धरणात उणे ३.३४ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी होती.

टीम अॅग्रोवन

सोलापूर : पुरेशा पावसाअभावी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण अद्यापही उणे पातळीत आहे. बुधवारी (ता.२१) दुपारपर्यंत धरणात उणे ३.३४ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी होती. जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाणी योजनांचे भवितव्य धरणातील पाण्यावरच अवलंबून असते. परंतु धरणातील पाण्याच्या स्थितीमुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे.  धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातच पाऊस कमी झाल्याने उजनी धरण मृतसाठ्यात आहे. तरीही वरच्या धरणांकडून येणारा विसर्ग कायम आहे. सध्या दौंडकडून येणारा विसर्ग ८७९१ क्युसेकवर आहे. या पाण्यामुळेच उणे पातळीत गेलेले धरण हळूहळू भरत आहे. बुधवारी हा पाणीसाठा उणे ३.३४ टक्के होता. गेल्या तीन-चार वर्षांत सलगपणे जुलैच्या महिन्यात धरण जिवंत साठ्यात राहिले आहे. पण यंदा पुरेशा पावसाअभावी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा आजअखेर जिल्ह्यात सरासरीच्या १४८ टक्के पाऊस झाला आहे. पण पाणीपातळीत वाढ होईल, असा दमदार पाऊस झाला नसल्याने पाण्याची चिंता वाढली आहे.  असा आहे पाणीसाठा  बुधवारी धरणातील एकूण पाणीपातळी ४९०.७७० मीटरपर्यंत होती. तर एकूण पाणीसाठा ६१.४० टीएमसी इतका होता. त्यापैकी उपयुक्त साठा उणे १.७९ टीएमसी इतका होता. तर पाण्याची टक्केवारी उणे ३.३४ टक्क्यांपर्यंत होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT