सिंधुदुर्ग: ‘क्यार’नंतर आता महाचक्रीवादळाचे सावट
सिंधुदुर्ग: ‘क्यार’नंतर आता महाचक्रीवादळाचे सावट 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग: ‘क्यार’नंतर आता महाचक्रीवादळाचे सावट

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग: क्यार वादळाचा प्रभाव कमी होतो न होतो तोच आता महाचक्रीवादळाचे सावट घोंगावू लागले आहे. या चक्रीवादळाची चाहूल लागली असून, वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत असून जोरदार वारेदेखील वाहत आहेत. त्यामुळे उरलीसुरली भातशेती कापणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच वाढ झालेली दिसून येत आहे. क्यार चक्रीवादळाने जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. जिल्ह्यातील ७० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. परंतु अतिवृष्टी, क्यार वादळातून बचावलेल्या भातशेतीची कापणी करण्यात येथील शेतकरी गुंतला असतानाच आता महाचक्रीवादळाचे संकट जिल्ह्यावर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादळाचा थेट धोका होणार नाही, असे हवामान खात्याकडून सांगितले जात असले तरी, वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. जिल्ह्यात कालपासूनच ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी रात्री काही भागांत तर मुसळधार पाऊस कोसळला. पावसासोबत जोरदार वारे जिल्ह्याच्या सर्वच भागांत वाहत आहेत. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग अधिक असून, समुद्राला उधाण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वादळांच्या शक्यतेने शेकडो मच्छीमार नौकांनी किनाऱ्याला आश्रय घेतला आहे.  दरम्यान, प्रशासनानेदेखील मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला असून, येणाऱ्या वादळाचे संकट कमी होत नाही तोपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, पावसाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातकापणी थांबविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT