सांगली : जिल्ह्यात सांगली शहर आणि पेठ येथे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सेंद्रिय मॉल लवकरच सुरू होईल. सांगलीतील मॉल महिन्याभरात सुरू होणार आहे. नागरिकांना रासायनिक अंश विरहित भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, फळांसह ज्वारी, बाजरी, गहू आदी उपलब्ध होणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सांगलीतील सेंद्रिय मॉलसाठी निविदा काढली आहे. यामध्ये सेंद्रिय शेतकरी गट किंवा शेतकरी कंपन्यांकडून विक्रीसाठी निविदा भरावयाची आहे. संबंधित कंपनी किंवा गटाकडून शेतकऱ्यांचा सर्व माल सेंद्रिय प्रमाणित असेल, याची लेखी हमी द्यावी लागणार आहे. किंबहुना शेतकऱ्यांचा माल सेंद्रिय तपासणी करूनच या ठिकाणी आणावा लागणार आहे.
रेसिड्यू फ्री प्रयोगशाळेकडे लक्ष... सांगलीत रासायनिक अंश विरहित फळे, भाजीपाला मॉल सुरू होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी सध्या सेंद्रिय माल विकतात मात्र, त्यासाठीची तपासणी प्रयोगशाळा पुणे येथे आहे. परिणामी अनेक शेतकरी सेंद्रिय उत्पादने खुल्या बाजारात विक्री करतात. त्यांना चांगला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी लवकरच अद्ययावत प्रयोगशाळा सांगलीत सुरू होत असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. यासाठी २५ कोटी खर्च अपेक्षीत आहे. शेतकरी आणि ग्राहकांची यामुळे सोय होणार आहे.
दृष्टिक्षेपात सेंद्रिय मॉल...
प्रतिक्रिया
सेंद्रिय मॉलसाठी कृषी विभागाने निविदा काढलेली आहे. चार दिवसांत ती प्रसिद्ध होईल. त्यासाठी सेंद्रिय शेतकरी गट तसेच कंपन्यांना यामध्ये सहभागी होता येईल. अधिक तपशील नोटिशीत असेल. येत्या महिनाभरात सांगलीचा मॉल सुरू होईल. - बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.