परभणी येथे दुष्काळ निवारण संकल्प शिबिर
परभणी येथे दुष्काळ निवारण संकल्प शिबिर 
मुख्य बातम्या

शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः आदित्य ठाकरे 

टीम अॅग्रोवन

परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले फारसे कळत नाही, परंतु गंभीर दुष्काळी स्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी, वेदना जाणून घेण्यासाठी आपण दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहोत. या दौऱ्यामध्ये पीकविमा परतावा, तसेच कर्जमुक्ती मिळालेला एकही शेतकरी आपल्याला भेटला नाही. शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे हतबल होऊ नये. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तयार आहे, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे मदतीचे वाटप करण्यासाठी बुधवारी (ता. १६) एरंडेश्वर (ता. पूर्णा येथे दुष्काळ निवारण संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री. ठाकरे बोलत होते. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार मीराताई रेंगे पाटील, डॉ. सुप्रिया पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, डॉ. संजय कच्छवे, युवा सेना विस्तारक डॉ. गणेश राजेभोसले, अमित गीते, गंगाप्रसाद आणेराव, सोपानराव आवचार उपस्थित होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, की शिवसेनेतर्फे लवकरच शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. महिला सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवसेना सत्तेत असली तरी शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मराठवाड्यातील एकमेव जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शेळ्या, पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्य, महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिनवाटप करण्यात आले. तसेच पोलिस प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या युवक, युवतींना प्रशिक्षण सामग्रीचे वाटप करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT