शरद पवार
शरद पवार  
मुख्य बातम्या

चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ लवकरच नागपुरात

टीम अॅग्रोवन

नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा उत्पादकांचा यात शिरकाव झाल्यास उत्पादकांचे व्यापक हित साधले जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संत्रा विषयावरील बैठकीतूनच थेट चीनमधील भारतीय आर्थिक दूत प्रशांत लोखंडे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. चीनमधील खरेदीदारांसोबत नागपूरला याच आठवड्यात भेटीचा आग्रहही त्यांनी धरला. त्यामुळे लवकरच नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. रवी भवन येथे संत्रा उत्पादकांच्या समस्यांवर चर्चेकरिता शुक्रवारी (ता.१५) बैठक पार पडली. माजी कृषिमंत्री रणजित देशमुख, माजी आमदार आशिष देशमुख, काटोलचे आमदार अनिल देशमुख, जैविक शेती मिशनचे प्रमुख प्रकाश पोहरे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, महाऑरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ यांची या वेळी उपस्थित होते.  या वेळी शरद पवार म्हणाले, की संत्रा उत्पादकांच्या समस्यांना घेऊन महाऑरेंज आणि अभ्यासू शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासोबत पुढील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्रालय; तसेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली जाईल. संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न आणि शेतीनुकसानीच्या मदतीसंदर्भाने चर्चा होईल. संत्र्यात सद्या एकच वाण आहे. स्पेन आणि इस्त्राईलमधील वाण दर्जेदार असतील, तर तेथील संशोधन संस्थांशी, सरकारशी चर्चा करून ते देखील संत्रा उत्पादकांसाठी उपलब्ध करून देता येतील. त्याकरिता या देशांचा दौरा करण्याची गरज असल्यास शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत जाता येईल. फळांची गुणवत्ता सुधारा निर्यात करण्यापूर्वी संत्रा फळांची गुणवत्ता सुधारण्याची गरज शरद पवार यांनी संत्रा उत्पादकांच्या सभेत मांडली. फळांची गुणवत्ता सुधारल्याशिवाय कोणीच खरेदीदार तुमच्या दारात येणार नाही. त्याकरिता मोठे प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगीतले. बैठकीतील प्रमुख मुद्दे

  • संत्रा लागवड कर्जावरील व्याजदर कमी व्हावा.
  • द्राक्षाप्रमाणे संत्र्याच्या सिडलेस वाणांचे संशोधन.
  • नागपुरी संत्रा हेच एकच वाण असल्याने इतर वाण विकसित व्हावेत.
  • देशांअतर्गत बाजारपेठेसाठी रेल्वे वॅगची सुविधा.
  • ठिबक व कुंपणाकरिता अनुदान व त्यात वाढ.
  • संत्राप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरिता संसाधनाची उपलब्धता.
  • तांत्रिक मार्गदर्शनासाठी आधुनिक संसाधनांचा उपयोग.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

    Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

    Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

    Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

    Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

    SCROLL FOR NEXT